राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पंतप्रधान आवास योजनेच्या गलथान कारभारा विरोधात गाढव मोर्चा

अमरावती :-  प्रतिनिधी 
 केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकुल लाभार्थ्यांची धनादेश रक्कम देतांना जी 'मस्टर' ची अट लावली त्यामुळे लाभार्थ्यांना घर उभं करत असताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे सोबतच बऱ्याच लाभार्थ्यांना धनादेशाचा दुसरा टप्प्पा सुद्धा अजून पर्यंत मिळालेला नाही यातील बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असल्याचे निदर्शनास आले आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे अशातच या घरकुल योजनेत केंद्र सरकारने लागू केलेल्या जाचक अटी ह्या लाभार्थ्यांना नाहक त्रासाला कारणीभूत आहेत त्या अनुषंगाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.सुशील गावंडे व शहर जिल्हा अध्यक्ष निलेश शर्मा यांनी मोर्चाचे आयोजन करण्यात आले . मोर्चा जवादे मंगल कार्यालय  बस स्टँड अमरावती येथून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मालटेकडी कार्यालय येथे पोहचला तेथे प्रकल्प अधिकारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांना केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजने अंतर्गत येणाऱ्या घरकुल  लाभार्थ्यांच्या समस्या मांडल्या या वेळी गजानन रेवाळकर, सुशील गावंडे,  निलेश शर्मा, विपीन शिंगणे, साहिल सोलीव, प्रफुल्ल सानप, कुणाल विधळे, अनिरुद्ध होले, शैलेश राऊत, प्रतीक भोकरे, मंगेश पोल्हाड, अजित काळबांडे,  राजू येरहोकर, हेमंत बोबडे, शुभम पारोदे, दिग्विजय गायगोले, नितीन गावंडे, श्रीकांत तेलंग, कुणाल ठाकूर, निरंजन खडसे, वैभव तायडे, वैभव शिंदे, जावेद शेख, वैभव ठाकरे तसेच असंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
Previous Post Next Post
MahaClickNews