महेंद्र कॉलनी प्रभागात १.८२ कोटींच्या विकास कामांचा आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते लोकार्पण

.अमरावती 
शहरात विकास कामांची पूर्तता करतांना सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून पायाभूत सुविधांमधून मानव विकास साधण्यावर आपला भर राहिला आहे. नागरिकांचा सामाजिक स्तर व  राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी लोकवस्ती भागात सुसज्ज रस्ते, सांडपाण्याचा योग्य निचरा,अखंडित वीज पुरवठा, नियमित जलापूर्ती,स्वच्छता व सौदर्यीकरण यासह आरोग्य व शिक्षण आदी विकासात्मक बाबींचा  लाभ मिळणे गरजेचे आहे, त्यामुळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत विकासाची संकल्पना पोहचविणार असल्याची ग्वाही आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी दिली.
अमरावती महानगर पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ५ महेंद्र कॉलनी मध्ये १.८२ कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण व कार्यारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मूलभूत सोयी सुविधांच्या विशेष अनुदाना अंतर्गत ११८.६५ लक्ष निधीतून प्रवीण नगर, जयसियाराम नगर, मणिपूर लेआऊट, शोभा नगर मधील नाल्यांचे बांधकाम करण्यात येत आहे. यावेळी आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या हस्ते कुदळ मारीत भूमिपूजन करण्यात आले. तसेच मूलभूत सुविधांच्या ४९.९० लक्ष निधीतून प्रवीण नगर-व्हिएमव्ही रोड पाच मंदिर पर्यंतच्या रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. याचे लोकार्पण सुद्धा आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले. त्याच बरोबर आमदार निधीतील मणिपुरी कॉलनी ते अर्जुन अपार्टमेंट पर्यंतच्या रस्ता काँक्रीटीकरणाचे काम १३.५० लक्ष निधीतून करण्यात आले. यावेळी आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी  विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करून भूमीपूजनाची औपचारिकता पूर्ण केली. दरम्यान आमदार महोदयांनी स्थानीकांशी संवाद करीत निवेदनांचा देखील स्वीकार केला.दिवाळीचा प्रकाशपर्व सुरू होत असतांना परिसरात विकास पर्व नांदत असल्याने स्थानिक नागरिकांच्या वतीने आ.सुलभाताई खोडके यांचे आभार मानीत अभिनंदन करण्यात आले. 
याप्रसंगी आ.सौ. सुलभाताई खोडके समवेत राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके  नगरसेवक  धिरज हिवसे, बंडु निंभोरकर, प्रशांत पेठे, मदन जयस्वाल, प्रविण भोरे, यश खोडके, मनिष पावडे, माजी नगरसेवक  भुषण बनसोड, भोजराज काळे, अॅड. अमित जामठिकर, योगेश सवाई, नंदलाल सुंदरानी, गोपी खेमवानी, साै. वैशाली पेठे, अर्चना पारडे, राजश्री जठाळे, शितल पेठे, सुष्मा पारडे, विजया निंभोरकर, योगिता जठाळे, आरती वानखडे, शोभा कंकाळे, मंजु उचितकर, कल्पना इंगोले, प्रिती उचितकर, माधुरी चव्हाण, ललिता गौर, इंदु राऊत, सरिता गौर, कमला ठाकरे, आशा गुळधे, शालिनी जयस्वाल, चंद्रकला पारडे, शोभा चौधरी, निर्मला सोनटक्के, आरती गुप्ता, रजनी मुनघाटे, पुनम हाते, शोभा दाते, कविता खेमवानी, मचिना फतयानी, मनिषा कंकाळे, उषा खत्री, प्राची जेठानी, दिव्या लालवाणी, दिपा सुंदरानी, सरोजनी रोहरा, रेवलाणी, मनोज लांडे, नंदु काळे, गजानन विधाते, सचिन चव्हाण, अनिल तोंडरे, अविनाश पारडे, भागीरथ सारवान, विकी गवळी, रविंद्र उचीतकर, प्रशांत कंकाळे, गजानन तुरखडे, रामकृष्ण खैरकर, सुभाषराव साबळे, राजेश राऊत, साईल राऊत, गजानन वाडे, सुनिल तुरखडे, उमेश गुडधे, अशोकराव साबळे, गोपळराव पारडे, रमेशराव पेठे, देवेंद्र मुनघाटे, प्रथम पेठे, विठ्ठल उचितकर, साबाशंकर विश्वकर्मा, दिलीप चौकडे, अजय माथुरकर, अमोल पारडे, आनंदराव खांडेकर, गिरधर ठाकुर, शैलेंद्र शर्मा, प्रभु पवार, स्वप्निल काळे, गोपिचंद खेमवानी, जाकी खत्री, सुरेंद्र आमले, रोशन खडसे, विपिन दाते, प्रकाश नागवानी, भुजंगराव बंड, आेम मलिये, रमेश रोहरा, अमित रोहरा, अरविंद भाकरे, विलास खोबरखेडे, विजय पाटील, मनोज विजयकर, सचिन चव्हाण, कविश्वर इंगोले, बंटी शबलीया, रवि मंगवानी, शंकर बोधानी, खैराजमल खत्री, जॅकी खत्री, अमर पारवानी, धनराज रामरख्यानी, रोशन लालवाणी, विनोद मुलानी, लक्ष्मण विधानी, दिपक आहुजा, जितेंद्र गुप्ता, अजय माथुरकर, मनोहर पाब्यानी, आदि सहीत शोेभा नगर - मणीपुर काॅलनी - प्रविण नगर - जयसियाराम नगर - महेंद्र काॅलनी येथील जेष्ठ नागरीक, महिला भगिनींसह युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.
Previous Post Next Post
MahaClickNews