माविमच्या कर्मचार्यांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार - अँड यशोमती ठाकूर

मुंबई दि. १२ - महिला आर्थिक विकास महामंडळ ही राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी झटणारी, त्यांना सक्षम करणारी महत्वाची यंत्रणा आहे. या महामंडळाच्या कर्मचार्यांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्यात येतील असे आज महिला व बाल विकास मंत्री अँड यशोमती ठाकूर यांनी सांगितले. 
महिला आर्थिक विकास महामंडळाबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीस माविमच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, महिला व बाल विकास विभागाच्या प्रधान सचिव आय ए कुंदन, एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित होत्या. 
माविममधे कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचार्यांच्या वेतनश्रेणीमध्ये वाढ करणे, तेजस्विनी उपक्रमा दरम्यान १० टक्के असलेली वेतन वाढ कमी करुन ३ टक्के करण्यात आली होती. नवतेजस्विनी अंतर्गत पुन्हा १० टक्के वाढ लागू करणे आदी प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली. महिला ब बाल विकास विभाग या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक असून हे विषय पुर्णत्वास नेणे बाबत संबंधितांनी तातडीने प्रस्ताव सादर करावा असे निर्देश यावेळी अँड ठाकूर यांनी दिले.
Previous Post Next Post
MahaClickNews