कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी मुक्ततेसाठी मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार - महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर

मुंबई दि.12 - महिला कारागृहातील कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे लवकर सोडवून त्यांना मुक्त करणेबाबत महिला बाल विकास विभागाची भूमिका याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी मुक्ततेसाठी ‘मिशन मुक्ता’ही मोहीम राबविण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी दिली.
                       या बैठकीस महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, ॲड अविनाश गोखले आदी उपस्थित होते.
              महिला व बालविकास मंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, किरकोळ कारणासाठी कारागृहात बंदी असलेल्या महिला कैदी, त्यांना न्यायव्यवस्थेत कायदेशीर मदत मिळत नसल्यामुळे किंवा बोर्ड ऐकत नसल्यामुळे कारागृहात रहावे लागते, अशा महिलांना कायदेशीर मदत करून त्यांना कारागृहातून सोडवणुकीसाठी कोर्टामध्ये सहकार्य करणे व त्यांचे समुपदेशन करणे याकरिता महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण संचालक, महाराष्ट्र अभिवक्ता संचालक, जेल प्रिझन यांच्या समवेत महिलांच्या कायदेशीर सहकार्याकरिता राज्य महिला आयोगाचा सहभाग अशा रितीने ‘मिशन मुक्ता’ ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
             विधी सेवा न मिळाल्याने कारागृहात असलेल्या महिलांना विधी सेवेचे सहकार्य देण्याकरीता सुरुवातीला महाराष्ट्रातील महिला कैदी यांचे कच्चे कैदी, त्यांची प्रलंबित प्रकरणे याचा अभ्यास करणे व त्यांच्या गरजेनुसार विधी सहकार्य व समुपदेशन देणे. त्यांना आवश्यक असल्यास पुनर्वसनकरिता मदत करणे या पद्धतीचे काम विभागाच्या माध्यमातून करता यावे याकरिता मिशन मुक्ता कार्यरत असेल. यामध्ये कैद्यांच्या पुनर्वसनकरिता काम करणाऱ्या सामाजिक संस्थांचाही सहभाग असेल, असेही ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
Previous Post Next Post
MahaClickNews