रोगनिदान शिबीराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद• सागर देशमुख मित्र मंडळाचे आयोजन• बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीप्रित्यर्थ नागरिकांची नि:शुल्क तपासणी

अमरावती
           हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सागर देशमुख मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत रोगनिदान शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत भरभरून प्रतिसाद दिला. येथील अॅक्झॉन हॉस्पीटलचे डॉ. महेंद्र गुढे आणि त्यांच्या चमुने नागरिकांच्या विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून त्यांना मोफत आरोग्य सल्ला दिला आहे.
           साईनगर परिसरातील क्रांती कॉलनी येथील गजानन धाम येथे रविवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या या मोफत रोगनिदान शिबीराचे उद्धाटन युवा सेनेचे नेते सागर देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी सुरूवातीला छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस हारार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश वानखडे, डॉ.महेंद्र गुढे, डॉ. सप्तेश शिरभाते, डॉ.सुधीर धांडे, डॉ.शैलेश जायदे आदींची उपस्थिती होती. या शिबीरात साईनगर परिसरासोबतच शहराच्या विविध कानाकोपऱ्यातून देखील नागरिक सहभागी झाले होते. शिबीरात अॅक्झॉन हॉस्पीटलच्या चमुने नागरिकांच्या तपासण्या करून घेतल्या. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी सागर देशमुख मित्र मंडळातील पदाधिकाऱ्यांनी प्रचंड परिश्रम घेतले.

दोनशेहून अधिक नागरिकांनी घेतला सहभाग
         या शिबीरामध्ये परिसरातील तब्बल २०० हून अधिक नागरिकांनी नोंदणी केली होती. तसेच अखेरपर्यंत दोनशेहून अधिक नागरिकांनी शिबीरात सहभागी होऊन आरोग्य तपासण्या करून घेतल्या. यावेळी नागरिकांनी सागर देशमुख मित्र मंडळाप्रती आभार प्रकट केले. या शिबीरामध्ये नागरिकांची शुगर टेस्ट, लिपिड प्रोफाईल, ब्लड प्रेशर, ईसीजी, थायरॉईड टेस्ट, बोन मॅरो डेन्सिटी स्कॅन आदी तपासण्या करण्यात आल्या. तसेच आवश्यक असलेल्या नागरिकांना उपस्थित डॉक्टरांच्या चमूने आरोग्य सल्ला देखील दिला. 
            
Previous Post Next Post
MahaClickNews