प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांनी देशासाठी केलेले कार्य अविस्मरणीय

अमरावती 
जिल्हा काँग्रेस कमिटीकडून,आयोजन

 देशातील पहिल्या महिला प्रधानमंत्री आयरन लेडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी भारतीय राजनीतीमध्ये आपली वेगळी छाप उमटवली होती त्या जगभरात ताकद वर नेत्या म्हणून अल्पावधीतच प्रसिद्ध झाल्या होत्या त्यांनी केलेले कार्य हे देशवासीयांसाठी  अविस्मरणीय असल्याचे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केलेे अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी करून आयोजित
आज इंदिरा गांधी यांची  जयंती  निमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करीत होते इंदिरा गांधी प्रधानमंत्री पदी असताना त्यांनी देशातील अर्थव्यवस्था मजबूत करण्याकरिता बँकांचे राष्ट्रीयीकरण केले तसेच राजे महाराजे यांचे राज भत्ते बंद करून त्यांचे देशात विलगीकरण केले 
देशातील पहिला परमाणु परीक्षणाचा कार्यक्रम 18 मे 1971 मध्ये पोखरण  येथे केला व 1984 मध्ये ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवून खलिस्तान वाद्यांचा खातमा केलाअसे निर्णायक पावले प्रधानमंत्री स्वर्गीय इंदिरा गांधींनी उचलले त्यांचे कार्य देश कधीच विसरणार नाही असे ते म्हणाले ,
 पालकमंत्री  यशोमतीताई ठाकूर--
    देशातील गरीबी निर्मूलना करिता  स्व. इंदिराजी गांधी यांचा सिंहाचा वाटा  असून  देशात स्वातंत्र्य समता  टिकवून ठेवण्यासाठी   इंदिराजींचे बलिदान  अविस्मरणीय  असल्याचे प्रतिपादन  पालकमंत्री यशोमती ताई ठाकूर यांनी केले
    या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय इंदिराजी गांधी यांचे प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 
 याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री  यशोमतीताई ठाकूर, आमदार  बळवंतराव वानखडे, जिल्हा काँग्रेस पदाधिकारी सर्वश्री़ प्रकाशराव काळबांडे, भैय्यासाहेब मेटकर. भागवतराव खांडे. संदीप राव रीठे,संजय लायदे. प्रदीप देशमुख.  , हरिभाऊ मोहोड. सिद्धार्थ उर्फ बच्चु बोबडे.विनोद गुडदे . बिट्टू मंगरुळे, अभिजीत देवके, दत्ताभाऊ कुंभलकर, गजाननराव देशमुख, संदीप रिठे, अमोल ठाकरे, नंदूभाऊ यादव,समाधान दहातोंडे.  बबलू बोबडे.  विषाल भट्टाड, उपस्थित होते
Previous Post Next Post
MahaClickNews