जिरेमाळी समाजाचा उपवर युवक युवती मेळावा संपन्न मेळाव्याचे महत्व जाणून घेण्यासाठी बाप व्हावे लागते, व आईचं ह्रदय ‌जपावे लागते.निळकंठराव जेवडे गुरुजी

अमरावती, दि. २८: जिरेमाळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजातील प्रत्येकाने एकजुटीने प्रयत्न करावे, असे आवाहन अध्यक्ष मा श्री निलकंठराव जेवडे गुरुजी(जोतिषाचार्य) यांनी आज येथे केले.

उपवर युवक युवती परिचय मेळावा ऑनलाईन पद्धतीने जिरेमाळी समाज बहुउद्देशीय संस्था म.रा. अमरावती चे वतीने स्थानिक अभियंता भवन अमरावती येथे संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी ज्योतिषाचार्य मा. श्री निळकंठराव जेवडे गुरुजी होते. कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री मधुकरराव मारोडकर तसेच दीप प्रज्वलन मा. श्री दिगांबर गुंजकर व श्री ज्ञानदेव चवाळे यांनी केले.‌ याप्रसंगी मुला-मुलींचा संपूर्ण परिचय असलेली *अनुबंध २०२१* पुस्तीकेचे विमोचन मा. श्री विजयराव मडके माजी सभापती यांच्या हस्ते करण्यात आले.   
 अनुबंध २०२१ द्वारे जवळपास   ५२५ मुला-मुलींनी आपला परिचय करून दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव व शासनाचे निर्बंधांमुळे हा मेळावा समाज बांधवांची प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थिती ठेवून पुर्णपणे ऑनलाईन पद्धतीने   ( आभासी ) घेण्यात आला. *झुम मीठ, युट्यूब, फेसबुक* इत्यादी व्दारे हजारो समाज बांधवांनी आपला सहभाग मेळाव्यात नोंदवला. डॉ. श्री सुरेश नंदन श्री किशोर घरटे यांनी आपले ऑनलाईन मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यामुळे आपल्या मुला-मुलींनसाठी योग्य जिवन साथीची निवड करणे सोयीचे होते व वेळेची आणि पैशाची बचत होते. *उपवर मुलामुलींच्या आई वडीलांसाठी मेळाव्याचे किती अनमोल महत्त्व आहे हे जाणून घेण्यासाठी बाप व्हावे लागते, आईचे ह्रदय जोपासावे लागते* असे ह्रदयस्पर्शी व भावनिक प्रतिपादन याप्रसंगी मान्यवरांनी केले. मराठी व हिंदी सिनेमातील गाणी काही मिनिटांतच ओळखण्याचा विश्वविक्रम करणारे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मा. श्री कैलासराव तानकर यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला.

 या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून इंजि. शिवाजीराव नांदगावकर, इंजि. वासुदेवराव बोराडे, श्री गंगाधरराव भागवत,श्री गजानन साळवे, श्री सुनील बोराडे, श्री कैलास तानकर,अक्षय पारस्कर, श्री प्रकाश मारोडकर होते. तर कार्यक्रमामध्ये सर्व श्री सुरेश मारोटकर, सुनील मारोटकर,गणेश काळेकर, संजयराव जेवडे,राजेंद्र तरास, किशोर खंडारे, कमलेश नांदगावकर, गजानन तानकर, पंकज सपकाळ, अशोक रुमने, विनोद बुंदे, बाळासाहेब रुमने,प्रभाकर जेवढे, विक्रम तानकर,नितीन भोजापुरे, निनाद जावडे, सौ. सविता खंडारे, सौ. तारा अहिरकर या पदाधिकारीनी सहभाग घेतला.
           कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष श्री दिनकरराव तानकर  यांनी व उपस्थितांचे आभार सचिव श्री अविनाश भोजापुरे तसेच सुत्रसंचलन श्री मोहनराव भोजापुरे यांनी केले.
Previous Post Next Post
MahaClickNews