अमरावती दि.२०- भातकुली तालुक्यातील बहादरपूर जि.प.
शाळेतील उपक्रमशील शिक्षिका सौ.अर्चना राजेश सावरकर यांना राज्यस्तरीय मानवविकास पुरस्कार जाहीर करण्यात आला. गुरधाड (ता. देवणी जि. लातूर) येथील मानवविकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे हा पुरस्कार जाहीर झाला. २१ नोव्हेंबर रोजी लातूर येथील दयानंद सभागृहात हा मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
गुरधाड येथील मानवविकास संस्थेतर्फे विविध राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात अमरावती जिल्ह्यातून सौ.अर्चना राजेश सावरकर यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय मानवविकास पुरस्कार घोषीत करण्यात आला.अर्चना सावरकर ह्या शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दि प्रमुख राजेश सावरकर यांच्या सुविद्य पत्नी तर जि.प.शिक्षक सहकारी बँक अमरावतीच्या विद्यमान संचालिका आहे. बहादरपूर जि.प. शाळेतील उपक्रमशील शिक्षिका अर्चना राजेश सावरकर यांची पुरस्कारार्थी म्हणून निवड झाल्याने शिक्षणक्षेत्रातील सर्व स्तरावरुन त्यांचे अभिनंदन होत आहे. लवकरच हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव हे राहणार आहेत. आदर्श ग्राम, हिवरेबाजारचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, गोरक्षा सेवा कार्य पद्मश्री शब्बीर सय्यद यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे, शिक्षक आ. विक्रम काळे, जगप्रसिद्ध प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉ. विठ्ठल लहाने तसेच सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अर्चना सावरकर यांची पुरस्कारासाठी निवड झाल्या बद्दल शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष तथा शिक्षक बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत,जिल्हा सरचिटणीस संभाजी रेवाळे,कार्याध्यक्ष मनिष काळे,राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर, महीला आघाडी प्रमुख सरीता काठोळे, सरचिटणीस योगिता जिरापूरे,कार्याध्यक्ष सुषमा वानखडे,
कोषाध्यक्ष भावना ठाकरे,राज्य महीला प्रतिनिधी प्रविणा कोल्हे,
भातकुली पं.स.
गटशिक्षणाधिकारी संतोष घुगे,शिक्षण विस्तार अधिकार विनोद टेंभे,केंद्रप्रमुख निता सोमवंशी,मुख्याध्यापिका सरोज मोहीते,शिक्षक समितीचे उमेश चुनकीकर,प्रफुल्ल वाठ ,गजानन कासमपूरे,