एकतर्फी कारवाई थांबवली नाही तर जेल भरो देवेंद्र फडणवीस

अमरावती शहरात 12 व 13 नोव्हेंबरला झालेला हिंसाचाराच्या दोन्ही घटना या निषेधार्य आहेत. परंतु 13 नोव्हेंबरला झालेला हिंसाचाराची घटना ही 12 नोव्हेंबरच्या घटनेची रिअॅक्शन होती. त्यामुळे जर 12 तारखेची घटना घडली नसती तर 13 ला पुन्हा हिंसाचार झालाच नसता. परंतु असे असतांनाही पोलीस प्रशासन मात्र एकतर्फी कारवाई करत असल्याचा आरोप राज्याचे विरोधीपक्ष नेता देवेंद्र फडणिवस यांनी केला आहे. भाजप आणि पक्ष संघटनांशी संबंधित हिंदूत्ववादी संघटनांच्या लोकांना टार्गेट करून पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत असून याचा निषेध फडणविस यांनी नोंदविला. राजकीय दबावाखाली पोलीस अशी एकतर्फी कारवाई करत असतील, तर भाजप राज्यभर जेलभरो आंदोलन करेल. सरकारचा हाच हेतू असेल तर भाजप पदाधिकारी स्वतःहून तुरुंगात जातील. असा इशारा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अमरावती दौर्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून दिला आहे.

पोलिसांना 12 नोव्हेंबरच्या घटनेचा विसर
12 आणि 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसाचारानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रविवारी शहर दौर्यावर आलेले माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जखमींची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की, पोलिस निरपराधांवर दंगलीचे गुन्हे दाखल करत आहेत. मसनगंजमध्ये एका महिलेने तक्रार केली की तिचा मुलगा मोटारसायकलवरून घरी येत होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला घरातून आपल्यासोबत नेले आणि त्याच्याविरुद्ध 307 व्यतिरिक्त अनेक गुन्हे दाखल केले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अधिवेशन लाखनी येथे होते, मात्र 13 नोव्हेंबरच्या हिंसाचारप्रकरणी शहर पोलिस अभाविपची यादी मागवून त्यांना गोवण्याचा प्रयत्न करित आहेत. अशा प्रकारे निरपराध लोकांना लक्ष्य केले जात आहे. जे भाजपा अजिबात सहन करणार नाही. भाजपच्या अमरावती बंद दरम्यान हिंसाचार झाला. आम्ही हे मान्य करतो, पण ही हिंसा 12 नोव्हेंबरच्या घटनेची प्रतिक्रिया होती.

फेक न्यूजच्या आधारावर पुर्व नियोजित मोर्चा 
अमरावती शहरातील घटना दुर्दैवी आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराचे किंवा जातीय उन्मादाचे समर्थन करत नाही. त्रिपुरात जे घडले ते कधीच घडले नाही. चुकीच्या माहितीच्या आधारे अल्पसंख्याक समाजाने मोर्चा काढला. हे मोठे षड्यंत्र होते. फेक व्हिडिओमध्ये सीपीआयचे कार्यालय आगीने वेढलेले दिसत होते. तसेच या त्रिपुराच्या नावे बनविण्यात आलेल्या फेक फोटो व्हिडीओमध्ये दिल्ली आणि पाकिस्तानच्या फोटो होते. परंतु य फेक न्यूजच्या आधारावर संपूर्ण राज्यातील विविध शहरात एकाच दिवशी एकाच वेळी मोर्चाचे आयोजन कण्यात आले होते. हे सर्व पूर्वनियोजीत होते. फेक बातमीच्या आधारे देशात आणि राज्यात मोर्चे काढून दंगल घडवण्याचा हा कट होता. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
Previous Post Next Post
MahaClickNews