५१.३९ लक्ष निधीतून बदलला जवाहर नगर भागाचा चेहरा मोहरा आ. सुलभाताई खोडके यांच्या निधीतून मूलभूत सुविधांची पूर्तता

अमरावती २२ नोव्हेंबर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जे धोरणात्मक निर्णय घेतले. त्या निर्णयांचा अमरावती शहराला भरपुर लाभ मिळत आहे.  शासनाकडून विकास  कामांकरिता भरीव निधी उपलब्ध करण्यात आला असून योग्य नियोजनातून रस्ते, नालींचे बांधकाम, सौदर्यीकरण,क्रीडांगण, नळजोडणी, विद्युत जोडणीची कामे मार्गी लागत असल्याने शहराचा कायापालट झाला आहे. याच शृंखलेत अमरावती विधानसभा मतदार संघातील जवाहर नगर भागात आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी ५१.३९ लक्ष निधीतून विकास कामांचा धडाका लावला.  ज्यामध्ये मूलभूत सोयी सुविधांच्या विशेष अनुदानातील २० लक्ष निधीतून ओम कॉलनी- ज्ञानार्पन कॉलनी परिसराला तारेचे कुंपण लावून सौदर्यीकरण करण्यात  आले आहे. तर समता कॉलनी ते अरुण कॉलनी पर्यंत जाणाऱ्या डी.पी.रस्त्याचे डांबरीकरण सुद्धा १५ लक्ष निधीतून पूर्णत्वास आले आहे. याच शृंखलेत  ११.८९ लक्ष इतक्या  आमदार निधीतुन  महेश नगर -कौशिक विहार ते रिंग रोड पर्यंतच्या नालीचे बांधकाम करण्यात आले. या तिन्ही विकास कामांचे लोकार्पण आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार महोदयांनी विकास कामांच्या नामफलकाचे अनावरण करून लोकार्पणाची औपचारिकता साधली. दरम्यान 
या परिसरातीलच कौशिक विहार येथील रस्त्याचे सुद्धा ४.५० लक्ष निधीतून बांधकाम करण्यात येत आहे. आमदार निधी या शीर्षाखालील या कामाचे भूमिपूजन देखील आ. सौ. सुलभाताई यांच्या हस्ते पार पडले.  गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित व विकासापासून अलिप्त  असलेल्या  जवाहर नगर भागातील समस्या मार्गी लावून विकास कामांची गतीने पूर्तता केल्या बद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने आमदार महोदयांचे आभार मानीत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली . याप्रसंगी नागरिकांशी  संवाद साधण्यासह आमदार महोदयांच्या वतीने निवेदनाचा स्वीकार करण्यासह आगामी काळात सर्वांगीण विकासाकरिता  नियोजन करीत त्याची पूर्तता करण्याकरिता आपण कटिबद्ध आहोत, असा विश्वास सुद्धा व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचे समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके , नगरसेवक  प्रशांत डवरे , नीलिमा काळे , मंजुश्री महल्ले , प्रशांत महल्ले ,यश खोडके ,  सचिन ससाने, सचिन सगणे, अतुल देशमुख, उध्दवराव कवीटकर, सुभाषराव रेवस्कर, गुलाबराव सुरंसे, प्रकाश कंडाळे, शिवदास वानखडे, चेतन कडु, रुपरावजी इंगळे, अरुणकुमार आठवले, शरदराव शिनकर, हरीभाऊ पुनसे, निलेश अग्रवाल, हर्षद पुनसे, महादेवराव धमाले, प्रविण इंगोले, नामदेवराव आकोलकर, एस.एस. टेकाडे, आर.डी. आवारे, एच.बि. भोगे, व्हि.एन. घाटे, एस.पी. देशमुख, सुशिल कंठाळे, मारोतराव विरुळकर, अजयराव गुबरे, अरविंदराव भेंडे, मधुसुदन लहाणे, व्हि.डी. ढोरे, देवेंद्र पेढेकर, कृष्णराव बैतुले, नागोराव मानकर, त्र्यंबक माने, प्रल्हाद इंगोले, अरविंदराव महल्ले, आर.एच. कांडलकर, अशोक पारडे, ग.ना. मानकर, दि.वि. विघे, सुधाकर नागे, आर.जी. धोंडे, अशोकराव इंगळे, मिलिंद ढाकुलकर, व्यंकटराव दखणे, रामभाऊ रहाटे, दिलीपराव चव्हाण, मिलिंद देशमुख, विनायकराव अंभोरे, मोहन माथंडे, विलासराव नाथे, रविंद्र दिवटे, भास्करराव करडे, सुनिल इंगोले, प्रफुल ठाकरे, मंगेश भालचक्र, गाैरव इंगोले, सागर इंगळे, नितिनभाऊ भेटाळु, बंडु निंभोरकर, प्रशांत पेठे, भोजराज काळे, मनिष बुल, रनविर देशमुख, प्रथमेश बोके, स्वप्निल धोटे, प्रतिक पाटेकर, राहुल हरताळकर, सुयोग तायडे, आकाश वडनेरकर, दादु किटुकले, वैभव मोरे, सरला इंगळे, मंगला इंगळे, प्रियंका इंगळे, मेघा इंगळे, अर्पणा घाटे, निशा भोगे, मंदा ढोरे, सुनंदा सुर्यवंशी, शितल पुनसे, हर्षा पुनसे, संगिता इंगळे, निलिमा राऊत, रजनी कांडलकर, मंगला मावळे, रजनी पारडे, रजनी मानकर, प्रथा करडे आदींसह ज्ञानार्पण कॉलोनी, समता कॉलनी, अरुण कॉलनी, महेश नगर, कौशिक विहार येथील  स्थानिक नागरिक प्रामुख्याने हजर होते.
Previous Post Next Post
MahaClickNews