गावोगाव आरोग्य जागर; घरोघर जाऊन ज्येष्ठांचे लसीकरण_लसीकरण न झालेल्या कर्मचा-यांसाठी विशेष शिबिर

अमरावती, दि. २६ :  छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत उद्या २७ नोव्हेंबरला जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींत विशेष ग्रामसभा होणार आहे. 
पुनरीक्षण कार्यक्रमात अस्तित्वात असलेल्या मतदार यादीची पडताळणी व दुरुस्ती करण्यात येते. दिनांक १ जानेवारी, २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत मतदार यादीतील नावाच्या नोंदी तपासणे व नवीन मतदारांची नोंदणी होत आहे. त्यासाठी यापूर्वी १६  नोव्हेंबर रोजी एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याबाबत निर्देश शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेले होते. तथापि, अमरावती शहरात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. त्यामुळे ग्रामसभा पुढे ढकलण्यात आली. _ग्रा. पं. पोटनिवडणूक असलेल्या १०३ ग्रा. पं. वगळता_ इतर सर्व गावात उद्या ग्रामसभा होणार आहे. पोटनिवडणूक असलेल्या गावातही ग्रामसभा घेता येईल. मात्र त्यावेळी राजकीय व्यक्ती, पदाधिकारी यांची उपस्थिती नसावी व मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही घोषणा, कृती करण्यात येऊ नये,  अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews