मनसोक्त गप्पा-गोष्टी.अन पालकमंत्री यशोमतीताई सोबत एकत्र प्रवासही

अमरावती 
सकाळी शाळेत जाण्यासाठी बस थांब्यावर पाठेवर बॅगेच ओझं सांभाळत एस टी बसची प्रतीक्षेत असलेले अन परतीच्या प्रवासात थकलेले,अन अरे यार बस कधी येईल म्हणत ताटकळत असलेले चिमुकले विदयार्थी असं चित्रं ग्रामीण भागात हमखास दिसत असे.कोरोनाच्या संकटामुळे यात तब्बल दीड वर्षाचा खंड पडला इतकंच.आता परत शाळेची घंटा वाजली खरी पण एस टी कर्मच्यारांच्या संपामुळे प्रवासाची कसरत विध्यार्थ्यांना करावी लागतेय.

आज १४ डिसेंबर रोजी तिवसा तालुक्यातील फत्तेपुर येथील असेच काही विद्यार्थी परतीच्या प्रवासाठी मोझरीच्या बस थांब्यावर ताटकळत उभे होते.अन नेमक्या याचं वेळी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमतीताई ठाकुर या तिवसा येथून अमरावतीकडे जात होत्या.बस स्थानकांमध्ये काही विध्यार्थी-विध्यार्थीनी ताटकळत असल्याचे पाहून त्यांनीही आपली गाडी थाबविण्याची सुचना चालकाल केली अन त्या थेट त्यांच्या पर्यंत पोहचल्या.यशोमतीताई यांना बघून प्रथम गोंधळून गेलेल्या त्या सर्व विध्यार्थ्यांनी नंतर  शाळा आटोपून आपण घरी जात आहोत आणि त्यासाठी  वाहनाची प्रतीक्षा करीत असल्याच सांगताच यशोमतीताईनी त्यांना आपल्या गाडीत बसवून थेट त्यांच्या गांवी फत्तेपुर इथं पोहचवून दिलं.या काही किलोमीटरच्या प्रवासात पालकमंत्री अन विध्यार्थी यांच्यात गप्पा-गोष्टी चांगल्याच रंगल्यात.हे सहज घडलय पण पालकमंत्री यशोमतीताई यांच्यासोबतचा प्रवास अन गप्पाही हा प्रसंग मात्र त्या विद्यार्थ्यांसाठी कायम आठवणीत राहणारा अन आनंदाचे डोही आनंद तरंग असाच ठरला.
Previous Post Next Post
MahaClickNews