अखेर पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने वाघोलीच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला

अमरावती  दि. 9 डिसेंबर जिल्ह्यातील तिवसा मतदार संघातील वाघोली येथील शेतकऱ्यांना अखेर न्याय मिळवून देण्यात पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांना यश आले. आहे. रतन इंडिया पावर प्लांट च्या धुळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अखेरीस नुकसान भरपाई देण्यात आली.
अमरावती तालुक्यातील नांदगाव पेठ जवळील वाघोली येथील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून त्रस्त होते. रतन इंडिया पावर प्लांट मुळे या शेतकऱ्यांच्या शेतात धुळीचे साम्राज्य पसरलं होतं. या धुळीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते पिके जमीनदोस्त झाली होती. यासंदर्भात जिल्ह्याच्या पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांच्याकडे शेतकरी वारंवार तक्रार करीत होते ठाकूर यांनी रतन इंडिया पावर प्लांट सातत्याने संपर्क साधून अखेरीस या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून दिली. सहा शेतकऱ्यांना सुमारे तीन लाख आठ हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. जया ठेले यांना 90 हजार रुपये, ओमकार ठेले यांना 87 हजार 840 रुपये, सुरेश कांबळे यांना चाळीस हजार पाचशे रुपये, सुखंलाल चव्हाण यांना 34 हजार दोनशे रुपये, छबुलाल चव्हाण यांना 44 हजार 300 रुपये आणि ज्ञानेश्वर इंगोले यांना 14 हजार 400 रुपये मदत देण्यात आली आहे शेतकऱ्यांना मदत मिळाल्याबद्दल पालकमंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
Previous Post Next Post
MahaClickNews